जागतिक मराठी दिन २०१७-१८
सौ सुमेधा कुलकर्णी
या दिवशी मुलांनी विविध सांस्कृतिक कला गुणांचे सादरीकरण केले. इयत्ता चौथीच्या सर्वज्ञ उस्मानपूरकर याने " पाणी वाचवा" यावर कीर्तन सादर केले. मराठी विभाग प्रमुख सुमेधा कुलकर्णी यांनी मराठी दिन, मातृभाषा मराठी या संबंधी आपले विचार प्रकट केले.
२७ फेब्रुवारी हा दिवस टेंडर केयर होम या शाळेत जागतिक मराठी दिन म्हणून साजरा केला.
या दिवशी मुलांनी विविध सांस्कृतिक कला गुणांचे सादरीकरण केले. इयत्ता चौथीच्या सर्वज्ञ उस्मानपूरकर याने " पाणी वाचवा" यावर कीर्तन सादर केले. मराठी विभाग प्रमुख सुमेधा कुलकर्णी यांनी मराठी दिन, मातृभाषा मराठी या संबंधी आपले विचार प्रकट केले.
त्यानंतर छोट्या छोट्या बालकवींनी स्वरचित मराठी कविता सादर केल्या. ध्रुव खुरसाळे या सहावीतील मुलाने "मराठी भाषेचा गौरव" करणारा पोवाडा गायला .
गौरी लाहुरीकर मॅडमने बा. भ बोरकरांची कविता सुस्वरात सादर केली . नाट्य विभागाच्या अमर सरांनी ' वऱ्हाड चाललंय लंडनला" या एक पात्री प्रयोगाचा एक भाग सादर केला.
अशा प्रकारे विविध गुणदर्शनाने मराठी दिन अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला.
मराठी विभागाच्या सर्व शिक्षिका मनीषा जगताप, पूजा उपासे , क्षितिजा भावसार यांनी विशेष परिश्रम घेतले व उपप्राचार्य अनिता पाटील मॅडमने मार्गदर्शन केले.